Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- शहरासह जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स संसर्गित रुग्णांना शासन स्तरावरील औषधोपचार सेवासुविधा चांगल्या पध्दतीने पुरवून रुग्णांमध्ये जगण्याची उमेद वाढवणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) एआरटी सेंटरला शासनाकडून प्लस दर्जा मिळाला आहे, अशी माहिती एआरटी सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा वरेरकर-चिटणीस यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली. त्यामुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित रुग्णांना सेकंड लाइन...
  August 20, 11:02 AM
 • सोलापूर- प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानच्या पर्वतरांगांवर धावणाऱ्या टॉयट्रेनच्या पर्यटकांना आता वातानुकूलित (एसी) कोचमधून प्रवासाची साेय हाेणार अाहे. कुर्डुवाडी येथील वर्कशॉपमध्ये अाठ दिवसांत या एसी कोचची निर्मिती झाली असून दाेन दिवसांत ताे माथेरानला पाठवला जाईल. प्रायोगिक तत्त्वावर सध्या एकाच रेकला हा डबा जोडण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभला तर अन्य रेकसाठीदेखील एसी कोच तयार केला जाईल. या एका डब्यासाठी सुमारे आठ ते दहा लाखांचा खर्च आला. काही दिवसांपासून माथेरानच्या...
  August 20, 06:28 AM
 • उस्मानाबाद - शहरातील तेरणा महाविद्यालय ते पोलिस मुख्यालय या दरम्यानच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यावरून वाहनधारकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अक्षरक्ष: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर मंदिरासमोर असलेला जीवघेणा खड्डा दोघा तरुणांनी पुढाकार घेऊन बुजविण्याचा प्रयत्न केला. तेरणा महाविद्यालय ते बसस्थानक हा शहरातील प्रमुख मार्ग असून यावरून दररोज डझनभर अधिकारी, लोकप्रतिनिधी ये-जा करतात. परंतु, अलिशान वाहनातून या खड्ड्याची...
  August 19, 12:53 PM
 • सोलापूर - शहरात पाऊस पडतोय. त्यामुळे रस्त्यावरील पाण्यात लपलेले खड्डे वाहनधारकांना ठळकपणे जाणवू लागले आहेत. कुंभारवेेस, कोंतम चौक, साखर पेठ, भारतीय चौक, बाळीवेससह शहरातील १२०० किमी रस्त्यांपैकी ६०० किमी रस्ते खराब आहेत. हद्दवाढ भागात खड्डे आणि दलदल निर्माण झाली आहे. महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अध्यादेश जारी करून १३ कलमी कार्यक्रम महापालिकेला दिला आहे. त्याने तरी सोलापूर खड्डेमुक्त हाेणार का, की गणरायाचे स्वागत खड्ड्यांनीच होणार असा प्रश्न पडला...
  August 19, 12:50 PM
 • सोलापूर- मनोरुग्णांवर व्यवस्थित उपचार करता यावेत, यासाठी विम्यांचे सुरक्षा कवच दिले जाणार आहे. विमा कपंन्यांना मानसिक आरोगय कायदा लागू करण्यात आला आहे. सामान्य आजारासाठी विमा पॉलिसीव्दारे उपचार केले जातात. आता मानसिक आरोग्य कायद्यानुसार मनोरुग्णांवर विम्याव्दारे उपचार होतील. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशा सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना दिल्या आहेत. मानसिक आरोग्य कायदा २०१७ हा २९ मे रोजी संमत झाला आहे. त्यात म्हटले आहे की, विविध...
  August 18, 12:14 PM
 • सोलापूर- ज्येष्ठ विचारवंत, भाष्यकार, लेखक, संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर (८२) यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. विजापूर रस्त्यावरील बेन्नूरनगर आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. प्रा. बेन्नूर यांच्यावर शनिवारी दुपारी दोन वाजता मोदी जवळील मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रा. बेन्नूर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३८ रोजी सातारा येथे...
  August 18, 12:11 PM
 • प्रा. फखरुद्दीन बेन्नूर यांच्याशी पहिला संबंध आला तो या १९८२च्या जातीय दंगल रोखण्याच्या निमित्ताने. त्यावेळी त्यांचे जे धाडसी व्यक्तिमत्त्व दिसले, त्याच्याने मी प्रभावित झालो. निधड्या छातीने कठीण प्रसंगाला सामोरे जाणारा एक धडाडीचा माणूस त्यांच्यात दिसला. त्यावेळी ते तरुणही होते. वैचारिक बांधिलकी मानणारा आणि त्या विचारांसाठी कुठल्याही प्रकारचे संकट निर्भयपणे झेलू पाहणारा हा माणूस दिसला. तो चार भिंतीच्या सुरक्षिततेमधला विचारवंत नव्हता, प्रसंगी मैदानात दोन हात करण्याची त्यांची...
  August 18, 12:07 PM
 • सोलापूर- सोलापूर ते जत या एसटी बसने प्रवास करताना महानंदा हिरेमठ (रा. मित्रनगर शेळगी) यांच्या पर्समधून सात तोळे दागिने चोरीस गेले. ही घटना १४ आॅगस्ट रोजी घडली. फौजदार चावडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे . सौ. महानंदा व त्यांचे नातेवाईक जतला जाण्यासाठी बसमध्ये बसले. पर्समध्ये सोन्याचे दागिने, दोन हजार असे साहित्य ठेवले होते. चोराने पैसे व दागिने पळवले. त्याची किंमत चालू बाजार भावाप्रमाणे दोन लाख होते. मात्र पोलिसात ७२ हजारांची नोंद आहे. मजरेवाडी चौकात मंगळसूत्र हिसकावले मजरेवाडी चौकातून...
  August 18, 12:03 PM
 • तुळजापूर - सत्तेत राहायचे असेल तर धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, अन्यथा सत्तेतून पायउतार करू, असा सज्जड इशारा फडणीस यांना देऊन आता आरक्षण मिळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सुरेश कांबळे यांनी केला. धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने तुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा गुरुवारी(दि.१६) तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण गोंधळ घालून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संयोजक सुरेश कांबळे, आमदार नारायण पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर, डॉ. इंद्रजित...
  August 17, 12:51 PM
 • सोलापूर - उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी स्मार्ट सिटी कंपनीकडून करावी, यास महापालिका सभागृहाने मान्यता दिल्याचे सूचना व उपसूचनेत नमूद करण्यात आले आहे. पण तो प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे आला नव्हता. त्यामुळे पुढील कार्यवाहीस अडचण येत होती. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी व आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्यात चर्चा झाली. महापौर बनशेट्टी यांनी समांतर जलवाहिनीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे गुरुवारी सायंकाळी आयुक्तांशी चर्चा करताना स्पष्ट केले पण तो प्रस्ताव शनिवारी जाणार आहे. एकीकडे...
  August 17, 12:08 PM
 • सोलापूर- रेल्वे विभागातील रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक नागसेन मेंगर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मानित हाेणारे मेंगर हे सोलापूर विभागातील पहिले कर्मचारी ठरले आहे. मेंगर यांना पुरस्कार जाहीर झाल्याने सोलापूर विभागाची मान उंचावली आहे. गेल्या ३१ वर्षांपासून मेंगर हे आरपीएफच्या सेवेत आहेत. या सन्मानाबद्दल सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
  August 15, 12:53 PM
 • सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशपातळीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरसह १४ जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी भारत जाधव व कार्याध्यक्षपदी संतोष पवार यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष निवडीबाबत पक्षाने दोन वेळा मुलाखत प्रक्रिया राबविली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहराध्यक्ष म्हणून जाधव व कार्याध्यक्ष म्हणून पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून...
  August 15, 12:35 PM
 • सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने पुणे येथील उष्णदेशीय हवामान खात्याकडून कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीवरून प्रयोगाचे नियंत्रण ठेवले जात आहे. जिल्ह्यात पुढील ९० दिवसांत १८० तास उड्डाणाद्वारे कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला जाणार आहे. यासाठी २५ जणांची टीम कार्यरत असून सोलापूर विमानतळावर दोन विमानेही सज्ज अाहेत. ढगांची उपलब्धता पाहून प्रतिदिन दोन तपास विमानाद्वारे कृत्रिम...
  August 15, 12:31 PM
 • सोलापूर- सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली असून, आता ही गाडी पाच मिनिटे आधी म्हणजे १० वाजून ४० मिनिटांनी सोलापूर स्थानकावरून सुटणार आहे. बुधवारपासून (दि. १५) हा बदल अमलात येणार आहे. यासह कोल्हापूर- सोलापूर एक्स्प्रेस सोलापूर स्थानकावर पाच मिनिटे उशीरा पोहोचणार आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या मुंबईला पोहोचण्याच्या व मुंबईहून सोलापूरकडे निघण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सिध्देश्वर एक्स्प्रेसच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात आलेला नाही....
  August 15, 11:49 AM
 • सोलापूर- मार्केट यार्ड चौकात कंटेनरची दुचाकीला मागून धडक बसल्याने एक महिला ठार झाली. वैशाली केदारनाथ बिराजदार (वय ३४, रा. सध्या रमणशेट्टीनगर, शेळगी, मूळ शिरपनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. त्या पती केदारनाथ बिराजदार आणि मुलगी दीक्षासह दुचाकीने (एम.एच १३ ए.के. ७२९१) जात होत्या. त्यावेळी दुचाकीस मागून कंटेनरची (आरजी ०२ जी बी २०८९) धडक बसली. त्यामुळे त्या दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या...
  August 14, 11:32 AM
 • सोलापूर- केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे विभागाच्या हवामान खात्याकडून कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली आहे. यासाठी सोलापूर विमानतळावर दोन विमानेही तैनात केली आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत आज मंगळवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस पुणे हवामान विभागाच्या प्रकल्प संचालिका थारा प्रभाकरणन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत कृत्रिम पाऊस...
  August 14, 11:14 AM
 • सोलापूर- ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव शुक्रवारी आयोजित केल्याची माहिती डॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सव गौरव समितीचे राम गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर शहर-जिल्ह्यातील पुरोगामी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आयोजिलेला हा सोहळा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यापूर्वी सायंकाळी पाच वाजता डॉ. साळुंखे यांच्या समग्र ग्रंथसंपदेची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे....
  August 14, 11:07 AM
 • टेंभुर्णी- भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वरील १९ पैकी पाच धरणांतून उजनीमध्ये ४० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. सात धरणे शंभर टक्के भरली आहेत. सध्या बंडगार्डन येथून १४ हजार तर दौंड येथून एकूण १३ हजार ५८६ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. सोमवारी सकाळी दोन हजार ९९९ क्युसेक विसर्ग होता. त्यात सायंकाळी वाढ झाली. वरील धरणांतून येणारा प्रवाह मंगळवारपर्यंत (दि. १४) आणखी वाढणार असल्याने उजनीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या उजनी ३४ टक्के भरली आहे....
  August 14, 10:53 AM
 • सोलापूर- येथील पश्चिम मंगळवार पेठेतील धूत साडी दुकानात साड्या खरेदी करून ३३ लाखांचा चेक दिला. तो चेक वटला नाही. पैशाची मागणी केल्यानंतर शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी पुण्यातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीपक किसनराव जवळकर, रा. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुरुषोत्तम रामकिसन धूत यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी २०१४ या काळात घडली. जवळकर यांची व्यवसायाच्या माध्यमातून ओळख झाली होती. जवळकर यांनी सोलापुरात येऊन सुमारे ३८ लाख रुपयांच्या...
  August 13, 11:31 AM
 • सोलापूर- आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अप्रिय घटना, महिला, तरुणींना सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास अथवा छेडछाड याची माहिती पोलिसांना अाता व्हॉट्सअॅपवर देऊ शकता. शिवाय, पोलिस अायुक्तालयाने एक फेसबुक पेजही तयार केले आहे. ई-मेल, ट्विटरद्वारेही ऑनलाइन तक्रारी नोंदवू शकता. त्यासाठी शहर पोलिस नियंत्रण कक्षात खास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्काळ मदत करण्यासाठी उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. या शिवाय मंगळसूत्र पळवणे, मोबाइल, पाकीट पळवणे, सोन्याचे दागिने पॉलिसच्या...
  August 13, 11:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED