Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीऐवजी महापालिकेने करावे, असा ठराव मंगळवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत पारित केला होता. प्रत्यक्षात इतिवृत्तामध्ये उपसूचनेसह हे काम स्मार्ट सिटी कंपनीकडे सोपवण्यात येत असल्याचा ठराव झाल्याचे निदर्शनास आले आहे. आयुक्तांच्या प्रस्तावावर सभागृहाने विरोधात निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा दोन दिवसातच इतिवृत्तात मात्र यू टर्न घेतल्याचे समोर आले आहे. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी ते...
  August 3, 11:16 AM
 • सोलापूर- गेल्या दोन वर्षांपासून जुना बोरामणी नाका ते दयानंद कॉलेज रस्ता खड्ड्यात आहे. जणू काही दर्जेदार रस्ते करणार असल्याच्या अविर्भावात पावसाळ्यानंतर डांबरीकरण केले जाईल, असे महापालिकेने सांगितले हाेते. आणि आता मात्र शासनाचा नवीन आदेश आल्याचा दाखला देऊन रस्त्याच्या डांबरीकरणाचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होत असून, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सर्व प्रकारांतून मनपाच्या कारभाराचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे....
  August 2, 12:19 PM
 • सोलापूर- मराठा आरक्षण आंदोलनाचा जबर फटका एसटीला बसला. यंदाच्या वर्षी दगडफेकीच्या भीतीमुळे तब्बल ५५ हजार ९२५ वारकऱ्यांनी एसटीने प्रवास करणे टाळले आहे. तर १ हजारहून अधिक गाड्या आंदोलनामुळे पंढरपुरात पोहोचूच शकल्या नाहीत. मागच्या वर्षीच्या तुलनेने प्रवासी उत्पन्नात वाढ झाली असली तरी प्रवासी संख्या मात्र घटलेली आहे. १८ ते २७ जुलैदरम्यान एसटी प्रशासनाने पंढरपूरसाठी राज्यातून जवळपास ३७०० गाड्यांचे नियोजन केले होते. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी विभागांच्या गाड्यांचा समावेश होता....
  August 2, 12:13 PM
 • सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारामध्ये सुलभता यावी, पारदर्शकता असावी या दृष्टीने सहकार खात्याने काही चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सभासदांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळण्यास मदत तर होईलच, पण त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांचा नेहमीचा पैशांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सभासदांनाही प्रतिबंध करण्याची तरतूद या नव्या दुरुस्तीत करण्यात आली आहे. त्यामुळे कारभारात सुलभता, पारदर्शकता याबरोबरच सभासदांना कर्तव्याची जाणीव पण होईल. गृहनिर्माण संस्थांच्या कारभारासंदर्भात...
  August 2, 09:37 AM
 • सोलापूर- उजनी जलवाहिनी दुरुस्तीकरिता घेण्यात आलेल्या ४८ तासांच्या शटडाऊनबाबत कोणाला कल्पना दिली, दुरुस्तीचे काम पोट मक्तेदार कसे करत होता, काम चुकीचे झाल्यास त्याला कोण जबाबदार, दुरुस्तीच्या कामावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हता, दोन दिवसापासून आलेले गढूळ पाणी पिण्यायोग्य कसे, आदी नगरसेवकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर न द्यायला लावता महापौर शोभा बनशेट्टी यांनी आयुक्तांना उत्तर द्यायला लावले. यावर आयुक्तांनी मी नव्हतो, चौकशी करून दोषीवर कारवाई...
  August 1, 12:12 PM
 • सोलापूर- मान्सून वेळेत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात खरिपाची पेरणी केली. पण, गेल्या काही दिवसांपासून पाऊस लांबल्याने पीक वाळत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाऊ शकते. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १५ जूनपर्यंत ५४ हजार २९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीनने १०० ची टक्केवारी ओलांडली असून तुरीची ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७९ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे....
  August 1, 12:09 PM
 • सोलापूर- निम्मा पावसाळा संपला असून आतापर्यंत जिल्ह्यात १०९ मि.मी. पाऊस झाला आहे. पाच तालुक्यात ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात भरीव वाढ झाली नाही. उजनी धरणामध्ये जुलैअखेर ३४ टक्के पाणीसाठा तर जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ११.४६ टक्के पाणीसाठा असून यापैकी दोन प्रकल्पात वजा पाणीपातळी आहे. ५६ लघु प्रकल्पांपैकी ४९ प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत. सात प्रकल्पांमध्ये ३.४७ टक्के (४.१७ दलघमी) उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरित दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक...
  August 1, 11:56 AM
 • सोलापूर- उजनी समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. याच्या विरोधात तातडीने विषय आणून हे काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून न करता महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावे, असा निर्णय सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. यामध्ये महापालिका प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील दिलजमाई दिसून आली. ९ जुलै रोजी शासनाने नवीन पत्र पाठवून दिले. या पत्रामध्ये समांतर जलवाहिनीच्या पहिला टप्प्यातील २०० कोटी रुपये स्मार्ट सिटीच्या...
  August 1, 11:34 AM
 • सोलापूर- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई मराठा क्रांती मोर्चाने 1 ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन पुकारले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील जेलभरो आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. त्यामुळे उद्या मराठा क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन राज्यव्यापी होणार की नाही, याबात शंका उपस्थित होत आहे. अद्याप याबाबत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पुण्यात 5 हजार जणांवर गुन्हा सोमवारी पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी...
  July 31, 03:32 PM
 • दक्षिण सोलापूर- भाजीपाला विकून आम्ही दोघं नवरा-बायको कसंतरी जगतोय. पोरगं, त्याचा दोन लेकरांचा संसार सांभाळतोय. पोट भरण्यासाठी धडपडणारा घरचा कर्ता मुलगाच गेला. आता त्याच्या लेकरांसह आम्ही कसं जगायचं... मंद्रूपमध्ये आज स्लॅब डोक्यात पडल्याने गरिबीला तोंड देणाऱ्या आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाला, हे सांगताना वडील गुलाब शेख यांना दु:ख अनावर झाले. मंद्रूप येथे आज दुपारी ही घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दरवाजासमोरचा स्लॅब पडल्याने एका गरीब कुटुंबातील मजुराचा मृत्यू झाला. अब्दुल...
  July 31, 12:34 PM
 • सोलापूर- यंदा जिल्ह्यात जूनमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर मात्र पावसाने दांडी मारली आहे. मागील वर्षाप्रमाणेच जुलैमध्ये पाऊस गायब झाला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात फक्त १४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा त्यात थोडी वाढ होत ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीही जून महिन्यात १५० मि.मी. पाऊस झाला होता. यंदा जून महिन्यात ७७ मि.मि. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे निम्म्या मंडळात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मार्डी, शेटफळ, अर्जुननगर, टेंभुर्णी, म्हैसगाव, इस्लामपूर या मंडलमध्ये दोन महिन्यात २०...
  July 31, 12:32 PM
 • सोलापूर- मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या सोलापूर बंदला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व बाजारपेठांतील दुकाने बंद होती. मात्र शहरात काही ठिकाणी अांदाेलकांनी दगडफेक करत पाेलिसांना लक्ष्य केले, त्यामुळे संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांनाही जमावावर लाठीमार करावा लागला. गोंधळ घातल्याप्रकरणी १८० जणांना ताब्यात घेऊन रात्री सोडण्यात आले. तर, ४२ जणांवर दगडफेकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाने हा बंद पुकारला होता. सकल मराठा समाज संघटनेनेही रविवारी...
  July 31, 08:18 AM
 • सोलापूर- आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी आज (सोमवार) सोलापूर बंदची हाक दिली आहे. व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. सकाळपासून बंद शांततेत सुरू होता. मात्र बंदला उत्तम प्रतिसाद असताना आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या दरम्यान उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे गोंधळ आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे....
  July 30, 01:26 PM
 • सोलापूर- मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी सोलापूर बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा सुरू राहणार आहे. एसटी प्रशासनाने सुरक्षेसाठी पोलिसांना पत्र दिले असून गरजेनुसार पोलिस संरक्षणात एसटी गाड्या धावणार आहे. बंदच्या काळात अनुचित प्रकार घडला तर काही काळ त्या मार्गावरची वाहतूक थांबविण्यात येईल. मात्र एसटी सेवा बंद राहणार नसल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून एसटीवर वारंवार दगडफेक व जाळपोळ केली जात आहे. जवळपास ४५ लाखांहून अधिक एसटीचे...
  July 30, 11:57 AM
 • सोलापूर- अविवाहित तरुण मुलाच्या अपघाती निधनाने कोसळलेल्या मुळीया कुटुंबीयांना ध्यानीमनी नसताना मोठा आर्थिक आधार मिळाला. तोही अगदी दहा लाखांचा. ही माणुसकीची गोष्ट कर्नाटक बँकेच्या ग्राहक विमा योजनेमुळे शक्य झाली. धोत्रीकर वस्ती येथे राहणाऱ्या अरुण महाबल मुळीया (वय ३०) हा हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रघोजी ट्रान्स्पोर्टजवळ ट्रकवर काम करत होता. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी अपघात घडला. क्लच तुटून ट्रक मागे आल्याने त्याच्या डोक्यात सळई घुसली. त्याच्यावर अश्विनी रुग्णालयात नऊ दिवस...
  July 30, 11:47 AM
 • सोलापूर- दलित असलात तरी मोठे हाेत असताना मोठे ध्येय ठेवा, उत्तुंग यशासाठी प्रयत्नात सातत्य ठेवा. तसेच समाजानेही कर्तृत्वाला दाद द्यायला विसरू नये, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे केले. ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. भास्कर थोरात यांच्या हिरजची हिरकणी आणि चुंगीची पोरं या आत्मकथन पुस्तकाचे प्रकाशन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सकाळी विजापूर रोडवरील निर्मिती लॉन्स येथे हा प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी...
  July 30, 11:39 AM
 • सोलापूर - टेंभुर्णी ते इंदापूरदरम्यान महामार्गावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सोलापूर एसटी प्रशासनाने सोलापूर ते पुणे मार्गावरची गाड्यांची सेवा थांबवली होती. दुपारी १ नंतर पुन्हा गाड्या पूर्ववत सोडण्यात आल्या. यात शिवशाही सह अन्य गाड्यांना फटका बसला. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शनिवारी सकाळी वाकळेजवळ एका एसटीवर दगडफेक झाली. यात सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत एसटी प्रशासनाने...
  July 29, 12:20 PM
 • साेलापूर - शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीस देण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ही मोहीम राबवण्यात आली. शहरातील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे पाडकाम करून अहवाल द्या, असा आदेश न्यायालयाने दिला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली होती. प्रार्थनास्थळाचे पाडकाम करा, असा आदेश शासनानेही दिला. त्यानुसार महापालिकेने सर्व्हे करून अहवाल तयार केला. शहरात १७५९...
  July 29, 12:18 PM
 • सोलापूर - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी टेंभुर्णी ते इंदापूरदरम्यान महामार्गावर शनिवारी सकाळी चक्काजाम आंदोलन झाले. त्यामुळे एसटीसेवा आठ तास बंद होती. तर हिप्परग्यात जलसत्याग्रह करण्यात आला. रूपाभवानी मंदिरात रविवारी जागरण गोंधळ होणार आहे. दरम्यान, पोलिस आयुुक्तालयात सोमवारच्या बंदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी सकाळी हिप्परगा तलावात जलसत्याग्रह झाला. (दुसऱ्या छायाचित्रात) कडेवर उपस्थित आंदोलनकर्ते.
  July 29, 12:17 PM
 • सोलापूर- जागतिक कीर्तीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या कर्जत येथील विख्यात श्रद्धा रिहॅबिलीटेशन सेंटरचे संस्थापक डॉ. भरत वटवाणी याच्या कार्याचा सोलापूरलाही लाभ झाल्याचे रमाकंत दोड्डी यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. श्री. दोड्डी हे पूर्वी डॉ. वटवाणी यांच्या संस्थेत होते. आता सोलापुरात काम पाहतात. येथील मनोरुग्णांना बोलते करून कर्जतच्या संस्थेकडे पाठवणे, तिथे उपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे या कामात ते असतात. अशा पद्धतीने सोलापूरच्या अनेक...
  July 28, 11:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED