Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • माढा (सोलापूर)- राज्यात तसेच केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकारी हवेत आहेत. कुर्डूवाडीत भाजपचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी एका हॉटेलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाने उमेश पाटील यांना नाष्टा उधार न दिल्याने ही तोडफोड करत शिवीगाळ केल्याचे समजते. हॉटेलमधील चार टेबल व 20 खुर्च्यांचे नुकसान झाले आहे. सूत्रांनुसार, कुर्डूवाडी बायपास रोडवरील डॉ.लोंढे हॉस्पिटल समोरील विजया लक्ष्मी हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेल मालक निलेश राजु सावणे यांनी कुर्डूवाडी...
  April 21, 07:08 PM
 • उस्मानाबाद- नळदुर्ग येथील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर यांच्या 32 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील येडोळा शिवारात आज (शनिवार) ही घटना असून आनंद दासकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून शेतीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. हत्येनंतर तीन आरोपी स्वतःहून नळदुर्ग पोलिसांना शरण आले आहेत.
  April 21, 04:51 PM
 • श्रीरामपूर - रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी एक लाख ४८ हजारांची लाच स्वीकारणारा पंचायत समिती शाखा अभियंता अशोक केशव मुंढे (औरंगाबाद) यास येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी १० वर्षे सक्तमजुरी व ८५ लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये इतकी मोठी ऐतिहासिक शिक्षा सुनावण्याची राज्यातील ही बहुधा पहिलीच घटना असावी. जुनेद कलीम शेख या जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराने मे २०१६ मध्ये लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. आरोपी मुंढे हा श्रीरामपूर...
  April 21, 09:59 AM
 • सोलापूर -जम्मूच्या कठूआमधील आठ वर्षीय बालिकेवर दुष्कर्म आणि उत्तर प्रदेश मधील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म घटनेचा निषेध करत शहरातील सर्व समविचारी संघटनांच्या वतीने शुक्रवारी मूक धरणे करत महाआक्रोश व्यक्त करण्यात आला. पिडीतों को इन्साफ दो, गुन्हेगारोंको फाशी दो... अशी मागणी यावेळी करण्यात आली. कुल जमाअती तंजीमच्या अध्यक्षतेखाली सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक धरणे आंदोलन केले. तोंडावर काळी रिबीन बांधून, हातात मागणीचे फलक घेऊन...
  April 21, 09:16 AM
 • दक्षिण सोलापूर - घरची आर्थिक परिस्थिती बेताची, शेती आणि शिक्षणासाठी वडिलांनी काढलेले कर्ज आणि त्यातच बहिणीचे ठरलेले लग्न कसे होणार? या विवंचनेतून एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी (दि. २०) सकाळी अकराच्या सुमारास बरुर येथे ही दुर्दैवी घटना घडली. कविता विठ्ठल सुतार (वय २७, रा. बरुर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मंंद्रूप पोलिसांत याची नोंंद झाली आहे. बरुरचे विठ्ठल सिद्धप्पा सुतार यांंना पाच मुली. तीन एकर शेतीतील उत्पन्नावर धानम्मा व भौरम्मा या दोन...
  April 21, 09:13 AM
 • सोलापूर - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा एमआयएमच्या नगरसेवकांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून फेटाळून लावण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधारी भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांत शुक्रवारी चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापूर शहराच्या हिताचे काम करावे, मग त्यांना मानपत्र देऊ, असे भाजपने म्हटल्याने एमआयएमच्या नगरसेवकांचा तिळपापड झाला. सोलापूर शहरासाठी काहीच काम किंवा योगदान न देणाऱ्या योगगुरू...
  April 21, 06:09 AM
 • सोलापूर- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) संस्थापक अध्यक्ष खासदार असोउद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला आहे. ओवेसी यांचे महाराष्ट्रासह सोलापूरसाठी कुठल्याही प्रकारचे योगदान लाभले नाही. त्यामुळे त्यांना मानपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव आज (शुक्रवार) झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने फेटाळण्यात आला. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेत...
  April 20, 06:02 PM
 • माढा- दुष्काळ दूर करून गावाला जलयुक्त कराचंय, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायची असा निर्धार प्रत्येकाने करुन पाणी फाऊंडेशनच्यामहाश्रमदानाच्या चळवळीत तालुक्यातील लोंढेवाडीगावाने आघाडी घेतली आहे. गुरुवारी महाश्रमदानात हजारो महिला-पुरुषांनी सहभाग घेतला. एकजुटीनं पेटलं...रान...तुफान आलं या....यासह इतर गीतांच्या ध्वनीफित लावून लोंढेवाडीतअवघ्या दोन तासांत 700 घनमीटर काम झाले. 70 टॅंकर पाणी साठा अर्थात 70 लाख लीटर पाणी साठवण्यात आले.या महाश्रमदानासाठी गावातीलमहिला, पुरुषांसह...
  April 20, 03:29 PM
 • जळगाव -महामार्गावरील गुजराल पेट्राेल पंपानजीक शाळेच्या इमारतीमधील वादग्रस्त एन.एन.वाइन्स या दारू दुकानाला पूर्वाश्रमीच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये राज्यमंत्र्यांनी दुकानास अंशत: मान्यता देऊन तात्पुरता दिलासा दिला होता.सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतची दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर हे वादग्रस्त दुकान काही दिवस बंद होते. परंतु शहरासाठी न्यायालयाने निर्णयामध्ये बदल केल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर...
  April 20, 09:48 AM
 • सोलापूर -अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करणाऱ्या तरुणाला प्रथम जलदगती न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जावेद सलीम पठाण (वय २३, रा. कुंचीकोरवी गल्ली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. शिवण क्लासला जाते म्हणून एक अल्पवयीन मुलगी १२ जानेवारी २०१६ रोजी घराबाहेर पडली होती. तेव्हा आरोपी जावेद याने तिला धमकी देऊन मोटारसायकलवर जबरदस्तीने बसविले. त्यानंतर मुलीला विडी घरकुल येथील मित्राच्या घरी नेऊन दुष्कर्म केले. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
  April 20, 09:41 AM
 • सोलापूर - स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील १०१४ एकरचा विकास होत आहे. शहरातील गावठाण भागासह विकासाचा समतोल हद्दवाढ भागातही करण्याचा प्रयत्न आहे. याकरिता शासनाकडून आलेल्या सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी त्या भागात वापरला जाणार अाहे. त्यात प्राधान्याने पाणीपुरवठा व रस्ते याकडे लक्ष देण्यात येणार आहे. शिवाय शहरातील वाहतूक सेवा सुरळीत करण्यासाठी ५४ मीटर रस्ता करण्यात येत आहे. त्यासाठी अवंतीनगर रेल्वे रूळाजवळ भुयारी मार्गास शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. नगरोत्थान योजनेतून शहरात करण्यात...
  April 20, 09:31 AM
 • सोलापूर- भाजी विक्रीसाठी मोटारसायकलवरुन चाललेल्या एका शेतक-याला अज्ञात ट्रकने धडक दिली पण सहकारमंत्र्यांच्या तत्परतेमुळे त्याला वेळीच हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्याचे प्राण वाचले. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते, होनमुर्गी गावाजवळ अपघातग्रस्त शेतकरी जखमी अवस्थेत विव्हळताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता गाडी बाजूला घेतली आणि त्याला मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वत:ची गाडी देऊन जखमी उपचारासाठी सिव्हिल...
  April 19, 04:58 PM
 • सोलापूर- झटपट श्रीमंती, काहीची देणी द्यायची असल्यामुळे पोपट मनोहर मुळे (वय ३२, रा. खंडाळी, मोहोळ) याने जोशाबा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी बुधवारी दिली. मुळे याला मंगळवारी अटक केल्यानंतर जावेदसाब वालीकर (रा. हलसंगी, इंडी) याच्या मदतीने हा प्रकार केला. मुळे व वालीकर हे दोघे सोलापूरच्या कारागृहात असताना दोघांनी कट रचला. मार्च महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात बाहेर अाल्यानंतर ११ मार्च रोजी जोशाबा पंपावर दरोडा...
  April 19, 11:18 AM
 • सोलापूर- उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी अमृत योजनेतून ४३९ कोटी शासनाने मंजूर केले. यातून ११० एमएलडी पाण्याची जलवाहिनी घालण्यात येणार आहे. या योजनेस मंजुरी दिल्याने भाजप नगरसेवकांकडून महापालिका सभागृहात अभिनंदनाचे दोन वेगवेगळे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव मंजूर होत असताना काँग्रेसकडून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला जाणार आहे. २० एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका सभेपुढे प्रस्ताव आहेत. या अभिनंदन प्रस्तावावर राजकारण रंगण्याची चिन्हे...
  April 19, 11:07 AM
 • सोलापूर- दमदार पावसाचा अंदाज असला तरी राज्य सरकारने कृत्रिम पावसाच्या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे कृत्रिम पावसाचे केंद्र सोलापूर येथे सुरू करण्यास केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून कृत्रिम पावसाच्या प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. जून महिन्यापासूनच दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा सज्ज असणार आहे. मंत्री देशमुख यांनी राज्य...
  April 19, 11:04 AM
 • आंतरराष्ट्रीय स्तरावरील संत बसवेश्वर वचन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक विश्वनाथ कोरणेश्वर महास्वामीजी (उस्तुरी मठ, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी श्री बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधला. महास्वामीजी म्हणाले, बाराव्या शतकात संत बसवेश्वरांनी लोककल्याणार्थ समानतेची चळवळ उभारली. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. वचनातून सामाजिक न्याय संकल्पना मांडली. व्यक्तीपूजेचे वाढते स्तोम, मंदिरे-मूर्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रध्देला मूठमाती दिली....
  April 18, 10:38 AM
 • सोलापूर- उस्मानाबादहून सोलापूरकडे कारमधून येताना अायशर टेम्पोची धडक बसल्याने सोलापुरातील दोघा प्राध्यापकांचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी अाहे. तामलवाडी (ता. तुळजापूर) येथील कटारे स्पिनिंग मिलजवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. प्रा. शेखर कुलकर्णी (वय ४८, रा. अासरा चौक, सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रा. प्रवीण दुस्सा (वय ३०, रा. अशोक चौक, सोलापूर) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. प्रा. संदीप मेटकरी (रा. दमाणीनगर, सोलापूर) हे जखमी अाहेत. उस्मानाबाद येथील शासकीय...
  April 18, 10:22 AM
 • सोलापूर- जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप मार्चअखेरला बंद झाले, पण एकाही साखर कारखान्याने एफआरपीनुसार दर दिला नाही. ऊस नेल्यानंतर १४ दिवसांत रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बंधनकारक असताना अनेक कारखान्यांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. साखर आयुक्त कार्यालयाने ३१ मार्च रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी २५१४ कोटी ९४ लाख रुपये थकवले आहेत. शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे एफआरपीपोटी १०९ कोटी ३८...
  April 18, 10:18 AM
 • सोलापूर- कठुआ व उन्नाव येथील अल्पवयीन मुलींवर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे, असा आक्रोश व्यक्त करत यातील आरोपींना सरकारने पाठीशी घालण्याच्या प्रयत्नांचा विविध संघटनांनी सोमवारी निषेध केला. पाशवी कृत्यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत विविध सामाजिक संस्था, संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जम्मूच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून आठ जणांनी सामूहिक दुष्कृत्य केले. आठ दिवस गावातील मंदिरात...
  April 17, 09:41 AM
 • सोलापूर- गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत अाणि मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या यशवंत जलाशय उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीला राज्य शासनाने अमृत योजनेतून मंजुरी दिली. तसा अादेश १३ एप्रिल रोजीच जारी केला. ४३९ कोटी रुपयांच्या खर्चाची ही योजना अाहे. दरम्यान, भीमा नदीवरील शेतीसाठी पाण्याची सोय करा, अन्यथा ही पाइपलाइन होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात दिला अाहे. हा नवीन वाद पेटण्याची चिन्हे अाहेत. सोलापूर शहराला उजनीतून पाणी...
  April 17, 09:29 AM
 
जाहिरात

RECOMMENDED