- Marathi News
- Local
- Maharashtra
- Akola
- The Project At Kanadi Must Be Done As Per The Proposal; Villagers Demand, Gram Sabha Should Also Be Held; Statement To The District Collector
वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प:कानडी येथील प्रकल्प प्रस्तावानुसार होणे आवश्यक; ग्रामस्थांची मागणी, ग्रामसभाही घ्यावी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- कॉपी लिंक

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाअंतर्गत कानडी येथील साठवण तलाव प्रकल्प (उपसा सिंचन योजना) मूळ प्रस्तावानुसारच व्हावा. प्रसंगी ग्रामसभाही आयोजित करावी. अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित येथील ग्रामस्थांनी जिल्ह
सध्याच्या सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी संघर्ष करावा लागतो. पिकांना वेळेत पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतमालाचे उत्पादन घटते. त्यामुळे वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे. काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. गत काही दिवसांपासून कानडी येथील प्रकल्पावरून कानडीसह परिसरात मतमतांतरे होत होती. आपल्या जमिनीचे संपादन होणार असल्याने प्रकल्प नको. मात्र शेतीला पाणी मिळणारा प्रकल्प अन्य नजीकच्या गावांमध्ये करावा. अशी काहींची मागणी होती. अनुषंगाने विराहित व कानडी येथील काहींनी खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागातील अभियंत्यांच्या भेटी घेण्याचे सत्र सुरू केले होते. काहींनी कानडीऐवजी घोटा येथे प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागासमोर ठेवला होता. काहींनी पुन्हा कानडी येथेच प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवली होती. दरम्यान, आता कानडीच्या प्रकल्पावरून ग्रामस्थांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
दर व नवीन सिंचन योजना आदींमुळे प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता : नदीजोड प्रकल्पात मुख्य कालव्याची लांबी ३८८.२८ किमी असून लाभ क्षेत्र ४ लाख ४ हजार २८१ हे. आहे. तसेच सिंचन क्षमता ६ लाख ११ हजार १५० हे. असेल. प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता ९४ हजार ९६७ कोटी रुपयांची आहे. मात्र आता जमिनीचा दर व नवीन सिंचन योजना आदींमुळे प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावावर शासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नेत्यांमध्ये रस्सीखेच वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पावरून सत्ताधारी भाजपमधील अकोला पूर्व व मूर्तिजापूर मतदारसंघातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच कानडीच्या प्रकल्पावरून पाटबंधारे विभागात हालचाली सुरू आहेत. कानडी येथील प्रकल्प मूळ दलघमीनुसार कायम राहिल्यास घोटा, सिसा, उदेगाव येथील नवीन प्रकल्प अंतिमतः मंजूर झाल्यास आणखी जमीन संपादित करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच रेडी रेकनरनुसार दर पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मान्य नाहीत. त्यांना बाजारभावानुसार दर हवेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हीच मागणी अन्य नवीन प्रकल्पांतर्गत काही राजकीय नेत्यांच्या जमिनींबाबतही आहे. मात्र जमिनीचा मोबदला कमी असल्याने काहींनी पाटबंधारे विभागाकडे प्रकल्प रद्दबाबत पत्रही दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आता कानडी येथील प्रकल्पावरून ग्रामस्थांमध्ये दोन गट पडले आहेत.
प्रकल्प होवू नये, या बाजूने २० ते ३० टक्के नागरिक मूळ मंजूर झालेल्या प्रस्तावानुसारच कानडी येथे साठवण तलाव व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. याबाजूने ७० ते ८० टक्के नागरिक आहेत. प्रकल्प कमी क्षमतेचा व्हावा किंवा न व्हावा, या बाजूने २० ते ३० टक्के नागरिक असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. संभ्रम दूर करावा. अशी मागणी होत आहे.












