- Marathi News
- Local
- Maharashtra
- Cyclone Arnav Alert: Heavy Rain Forecast In Maharashtra | Weather Update
राज्यात पावसाचे सावट!:बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- कॉपी लिंक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 'अर्णव' नावाचे चक्रीवादळ तयार होत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रासह देशातील 13 राज्यांवर हो
बंगालच्या उपसागरात काय घडतंय?
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात गेल्या काही तासांपासून कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चक्रीवादळाला 'अर्णव' असे नाव देण्यात आले आहे. सध्या बंगालच्या खाडीतील वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किमीपर्यंत पोहोचला असून तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
या प्रणालीमुळे देशातील तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या 10 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील काही तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस कोरडे, मग पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज आणि उद्या म्हणजे पुढील दोन दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. मात्र 27 ऑक्टोबरपासून राज्यातील वातावरण बदलणार आहे.
- 27 ऑक्टोबर - गडचिरोली जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास राहील.
- 28 ऑक्टोबर - या दिवशी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर घाट, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातही हलक्या सरींची शक्यता आहे.
- 29 ऑक्टोबर - रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, जालना, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ-मराठवाड्यावर परिणाम जास्त
या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नसला तरी विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात. 27 आणि 28 तारखेला विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आज वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात सध्या उकाडा कायम असून कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

---------------------
हेही वाचा..

भारतीय हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि लगतच्या दक्षिण-पूर्व भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले आहे. ते २८ ऑक्टोबर रोजी बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा












