- Marathi News
- Local
- Maharashtra
- Aurangabad
- Licenses Of 12 Establishments Including Hotels And Blinkit Suspended In Sambhajinagar; Action Taken For Violating Hygiene Rules And Keeping Vegetarian And Non vegetarian Food Together
संभाजीनगरात हाॅटेल्स, ब्लिंकिटसह 12 आस्थापनांचे परवाने निलंबित:स्वच्छता नियमांच्या उल्लंघनासह शाकाहार-मांसाहार एकत्र ठेवल्याप्रकरणी कारवाई
- कॉपी लिंक

अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या निकषांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहर व जिल्ह्यातील १२ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. यात ऑनलाइन डार्कस्टोर, शैक्षणिक व औद्योगिक कॅन्टीन, नामांकित हॉटेल्स, डेअरी, केटरर्स आणि मिठ
कारवाई केलेल्या आस्थापनांपैकी काहींमध्ये कच्चे-शिजवलेले व शाकाहारी-मांसाहारी अन्न एकत्र ठेवणे, अस्वच्छ स्वयंपाकघर, तुटलेल्या फरशा, गंजलेली उपकरणे, कीडनियंत्रणाचा अभाव, चहा टपरीच्या नोंदणीवर हॉटेल चालवणे आणि पेढ्यांत पामोलिनयुक्त कच्चा माल व कृत्रिम रंगाचा अमर्याद वापर अशा त्रुटी आढळल्या.
एमआयटी प्रशासनाने म्हटले, नेहमीच नियमांचे पालन करत आले आहे. पाहणीत काही सूचना केल्या असल्यास अंमलबजावणी करु.
नोटिसांकडे दुर्लक्ष, टपरीच्या नोंदणीवर हॉटेल
एफडीएच्या तपासणीत केवळ अस्वच्छताच नाही, तर नियम धाब्यावर बसवण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. देवळाईतील एका हॉटेलला यापूर्वीच त्रुटी सुधारण्याची पूर्वसूचना दिली होती, तरीही त्यांनी कोणतीच सुधारणा केली नाही. गारखेड्यातील एका नामांकित हॉटेलचा व्यवसाय चक्क स्नॅक्स-चहा टपरीच्या नोंदणीवर सुरू होता. धक्कादायक म्हणजे, कारवाई झालेल्या १२ पैकी १० आस्थापनांना स्वच्छतेच्या निकषांवर ५० टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळाले आहेत.
१५ दिवसांत त्रुटी दूर करण्याचे आदेश
संबंधित आस्थापनांना अन्न उत्पादन व विक्री तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. १५ दिवसांत त्रुटींची पूर्तता करून अहवाल सादर करावा लागेल. फेरतपासणीनंतरच व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल. -श्रीकांत करकळे, सहआयुक्त
या १२ आस्थापनांचे परवाने निलंबित
ब्लिंकिट स्टोअर (उस्मानपुरा-इटखेडा), साईराज सुरुची फूड्स सर्व्हिसेस (एमआयटी कॅन्टीन), एफएफ सर्व्हिसेस (एंड्युरन्स कॅन्टीन, वाळूज), हॉटेल न्यू राजदरबार व श्रीहरी दूध डेअरी (देवळाई), राजदरबार मराठा हॉटेल (गारखेडा), रॉयल हॉटेल (छावणी), केजीएन केटरर्स (पहाडसिंगपुरा), एस. के. सवेरा हॉटेल (शहा बाजार), हॉटेल जयश्री व टेके फरसाण (वैजापूर) आणि श्री चामुंडा बिकानेर स्वीट (आळंद, ता. फुलंब्री).












