Sat, Nov 21, 2026Updated 04:11 PM IST

सीटी स्कॅन बंद, लिफ्ट ठप्प आणि बर्न वॉर्डही नाही:हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोयींविरोधात हिवाळी अधिवेशनावर धडकणार, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा

हिंगोली5 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मूलभूत वैद्यकीय सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर गैरसोयींविरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच वैद्यकीय महाविद्यालयासमोर आणि आगामी नागपूर हिवाळी अ

.

रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर संघटनेने ठेवले बोट

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खालील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

सीटी स्कॅन यंत्रणा बंद, एमआरआयचा आर्थिक भुर्दंड

रुग्णालयातील सीटी स्कॅन (CT Scan) यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे सीटी स्कॅनची गरज असलेल्या रुग्णांची थेट एमआरआय (MRI) तपासणी केली जात आहे. परिणामी, विशेषतः खाजगी रुग्णालयांतून सीटी स्कॅनसाठी पाठवण्यात आलेल्या रुग्णांना नाहक एमआरआयचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.

बर्न वॉर्डअभावी जळीत रुग्णांची परवड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होऊनही अद्याप स्वतंत्र बर्न वॉर्ड (जळीत कक्ष) सुरू करण्यात आलेला नाही. हिंगोली शहरात झालेल्या जळीतकांडानंतर बर्न वॉर्डची नितांत गरज असल्याचे समोर आले आहे; मात्र रुग्णालय प्रशासन जागेची अडचण असल्याचे कारण पुढे करत आहे. जागा मिळेपर्यंत बर्न वॉर्ड सुरू होणार नसेल, तर गंभीर जळीत रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे, असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

लिफ्ट बंद असल्याने शस्त्रक्रिया व सिझर झालेल्या महिलांचे हाल

रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे शस्त्रक्रिया (ऑपरेशन) झालेले रुग्ण आणि सिझेरियन झालेल्या प्रसूती मातांची मोठी गैरसोय होत आहे. या रुग्णांना वॉर्डमध्ये नेण्यासाठी नातेवाईक व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्यातील कागदोपत्री खेळामध्ये सामान्य रुग्णांचा मात्र जीव टांगणीला लागला आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त

रुग्णालयातील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, ज्याचा थेट फटका उपचारासाठी येणाऱ्या गरीब व ग्रामीण रुग्णांना बसत आहे.

या सर्व प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन रुग्णालयातील सुविधा पूर्ववत न केल्यास, हिंगोलीतील महाविद्यालयासमोर तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे यांनी दिला आहे.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links