Tue, Nov 17, 2026Updated 03:26 PM IST

मिशन ॲडमिशन:अशोका विद्यापीठात 2027 च्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; विद्यार्थ्यांसाठी 500 शिष्यवृत्तींची सुवर्णसंधी

मुंबई1 तासापूर्वी
  • कॉपी लिंक

संशोधनावर आधारित आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतातील आघाडीच्या अशोका विद्यापीठाने 2027 च्या शैक्षणिक वर्षासाठी पदवीपूर्व प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. 7 ऑक्टोबर 2026 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीत अर्

.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला विशेष चालना 2026-27 च्या या प्रवेश प्रक्रियेत नैसर्गिक विज्ञान आणि संगणकशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने 50 'अशोका नॅशनल सायन्स टॅलेंट शिष्यवृत्ती' सुरू केल्या आहेत. पूर्वी 'स्पेशल मेरिट स्कॉलरशिप' म्हणून ओळखली जाणारी ही योजना आता संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या 50 प्रतिभावान विद्यार्थ्यांना दिली जाईल.

शिष्यवृत्तींचे नियोजन आणि पात्रता जाहीर करण्यात आलेल्या एकूण 500 शिष्यवृत्तींचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:

गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती (200)

यातील 50 शिष्यवृत्ती या विज्ञान शाखेतील विशेष प्रतिभेसाठी (अशोका नॅशनल सायन्स टॅलेंट शिष्यवृत्ती) राखीव आहेत. उर्वरित 150 शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीनुसार दिल्या जातील. यामध्ये सीबीएसई किंवा आयएससी परीक्षेतील गुण आणि अशोका विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील कामगिरी, अथवा 'अशोका मॅथेमॅटिक्स चॅलेंज' आणि प्रवेश प्रक्रियेतील कामगिरी हे निकष विचारात घेतले जातील.

गरजेवर आधारित शिष्यवृत्ती (300)

आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी 300 गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात 100 टक्क्यांपर्यंत सवलत किंवा संपूर्ण शुल्क माफी मिळू शकते. कुटुंबाचे सध्याचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक आणि शैक्षणिक कर्ज घेण्याची क्षमता तपासून, अभ्यासक्रमाचा खर्च आणि कुटुंबाची आर्थिक क्षमता यांतील तफावत भरून काढण्यासाठी ही मदत दिली जाते.

आतापर्यंतचा प्रवास आणि सर्वसमावेशकता अशोका विद्यापीठाने आजवर 5,900 हून अधिक विद्यार्थ्यांना एकूण 854 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती प्रदान केल्या असून, कॅम्पसमधील 42 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत. मागील म्हणजेच 2026 च्या बॅचमध्ये 16 देश, भारतातील 26 राज्ये आणि 162 शहरांतील एकूण 509 शाळांमधून (ज्यामध्ये भारतातील 472 शाळांचा समावेश होता) विद्यार्थी दाखल झाले होते. या बॅचमध्ये 40 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. विशेष म्हणजे, आपल्या कुटुंबातून पहिल्यांदाच महाविद्यालयाची पायरी चढणारे 89 विद्यार्थी आणि अध्ययन अक्षमता, आकलनविषयक, शारीरिक, मानसिक आरोग्य व श्रवणविषयक विशेष गरजा असलेले 33 विद्यार्थी या बॅचचा भाग बनले होते.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग अशोका विद्यापीठाच्या विद्यार्थी समुदायात महाराष्ट्राचा वाटा अत्यंत लक्षणीय राहिला आहे. मागील प्रवेश प्रक्रियेत एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी सुमारे 20 टक्के विद्यार्थी हे महाराष्ट्रातील होते. राज्यातील विद्यार्थ्यांचा आंतरविद्याशाखीय शिक्षणाकडे वाढता कल पाहता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊन अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी आणि 23 नोव्हेंबर 2026 या पहिल्या फेरीच्या अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links