Mon, Nov 16, 2026Updated 06:44 PM IST

1,729 उमेदवार लढवणार BMC निवडणूक:उद्या अंतिम यादी प्रसिद्ध होणार; चिन्ह वाटपही होईल, 453 नामनिर्देशन पत्रे मागे

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्‍याच्‍या मुदतीत म्‍हणजेच २ जानेवारी रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्‍यात आली आहे. तर, १ हजार ७२९ उमेदवार न

.

राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.

नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत म्‍हणजेच ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.

या २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्‍यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार १८५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली.

नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या कालावधीत ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्‍यात आली. माघारीअंती स्‍पष्‍ट झालेल्‍या चित्रानुसार, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

आता ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍यात येणार आहे. चिन्‍ह वाटप पूर्ण झाल्‍यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्‍या नामनिर्देशन पत्रांची संख्‍या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्‍या याची माहिती पुढीलप्रमाणे -

१) ए + बी + ई विभाग (RO २३) - १९ / ९२

२) सी + डी विभाग (RO २२) - ०५ / ४४

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) - २१ / ५०

४) जी दक्षिण विभाग (RO २०) - १४ / ५१

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) - १८ / १०९

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) - २५ / ९३

७) एल विभाग (RO १७) - २० / ७६

८) एल विभाग (RO १६) - २४ / ७४

९) एम पूर्व विभाग (RO १५) - ४१ / १२१

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) - ४४ / ९७

११) एन विभाग (RO १३) - ३४ / ८८

१२) एस विभाग (RO १२) - १५ / ७०

१३) टी विभाग (RO ११) - २४ / ७९

१४) एच पूर्व विभाग (RO १०) - २५/ ८७

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) - १२ / ५८

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) - १८ / ८२

१७) के पश्चिम विभाग (RO ७) - १८ / १०४

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) - १४ / ५६

१९) पी पूर्व विभाग (RO ५) - २१ / ८१

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) - ११ / ६०

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) - १० / ८३

२२) आर मध्‍य विभाग (RO २) - ०७ / ३५

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) - १३ / ३९

एकूण – ४५३/ १७२९


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links