- Marathi News
- Local
- Maharashtra
- Mumbai
- Eknath Shinde Shiv Sena Meeting; Thackeray Group Mayor Presence Sparks Buzz
राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली?:एकनाथ शिंदेंच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षाची हजेरी; चर्चांना उधाण
- कॉपी लिंक

राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण आणि शरद पवार गट एनडीएत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' राबवण्याच्या हालचाली
राज्यातील शिवसेनेच्या 63 नगराध्यक्षांची सोमवारी एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत नगराध्यक्षांना स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी समजून घेत शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, या बैठकीत ठाकरे गटाचे सिंधुदुर्गचे नगराध्यक्ष संदेश पारकर हेदेखील सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चव्हाण सेंटरमधून काढता पाय
ही बैठक संपताच संदेश पारकर यांनी कोणाच्याही निदर्शनास न येता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमधून तातडीने काढता पाय घेतला. परंतु, काही तासांतच पारकर हे शिंदेंच्या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पारकर यांची ही गुप्त उपस्थिती आगामी काळातील नव्या 'ऑपरेशन टायगर'ची नांदी तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जून 2026 मधील 'ऑपरेशन टायगर'ची पुनरावृत्ती?
एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी जून 2026 मध्ये 'ऑपरेशन टायगर' राबवत ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार आपल्या गटात सामील करून घेतले होते. यामध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, मुंबई ईशान्यचे संजय दिना पाटील, परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश होता. आता संदेश पारकर यांच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा त्या मोहिमेच्या आठवणी ताज्या झाल्या असून, यावर ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ही देखील बातमी वाचा..
पवारांचा पक्ष भाजपची बी टीम नाही, डिलिमिटेशनवर कोणताही सौदा नाही:संस्कृतीप्रमाणे असणाऱ्या खाद्यावर बंदी योग्य नाही; मीरा-भाईंदर वादावर संजय शिरसाटांची भूमिका

कोणताच पक्ष कोणाची बी टीम नसतो, प्रत्येकाचे आपले वेगळे अस्तित्व आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. एखाद्या पक्षाला विरोध किंवा पाठिंबा दिला म्हणून त्यावर तातडीने बोलणं योग्य नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. अंजली आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या पक्षावर केलेल्या भाजपची बी टीम या टीकेवर ते बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या केवळ बातम्या आहेत; त्यांनी स्वतः सांगितले आहे की आम्ही डिलिमिटेशन बिलला पाठिंबा देणार आहोत, याबदल्यात दुसरा असा काही सौदा झालेला नाही. शरद पवार राजकीय निवृत्ती घेतील असे वाटत नाही; त्यांची तब्येत बरी नसली तरी ते दुष्काळी भागाचे दौरे करत आहेत, असेही शिरसाट यांनी नमूद केले. वाचा सविस्तर












