Wed, Nov 18, 2026Updated 03:20 PM IST

परिणय फुकेंनी लेकाला समोर आणत काँग्रेसचे आरोप फेटाळले:म्हणाले- माझ्या मुलाची एवढी काळजी घेणारे सपकाळ बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी ट्विट करायला का विसरले?

नागपूर2 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघातावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी फेटाळून लावले आहेत. बुधवारी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्

.

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना टोला

हर्षवर्धन सपकाळ यांनी यथार्थच्या अपघाताबाबत ट्विट करत माहिती घेतल्याबद्दल परिणय फुके यांनी उपरोधिक आभार मानले. ते म्हणाले की, "सपकाळांनी माझ्या मुलाची एवढी तसदी घेतली, पण काल हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. सपकाळांनी राहुल गांधींना सांगून बाळासाहेबांसाठी एखादे ट्विट करायला लावले असते, तर ज्या उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्यांची किमान इज्जत तरी राखली गेली असती." तसेच, सोनिया गांधींच्या पुस्तकात शरद पवार यांचा उल्लेख केवळ एका 'लोकल नेत्या'सारखा करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान केला असल्याची टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील 27 ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत समावेश होणार; अमित शहांचे आश्वासन

पत्रकार परिषदेत परिणय फुके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीची माहिती दिली. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या मात्र केंद्रीय सूचीत नसलेल्या 27 ओबीसी जातींचा समावेश केंद्रीय यादीत करावा, जेणेकरून त्यांना केंद्रीय नोकऱ्या, एमबीबीएस, आयएएस आणि यूपीएससीमध्ये आरक्षण मिळेल, अशी मागणी आपण अमित शहा यांच्याकडे केली. पुढील 6 ते 8 महिन्यांत सर्व राज्यांचा अभ्यास करून या जातींचा केंद्रीय यादीत समावेश करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

2027 च्या जनगणनेत ओबीसींची नेमकी आकडेवारी स्पष्ट होणार

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2027 पासून जातीनिहाय जनगणना सुरू होत आहे. या जनगणनेचा संपूर्ण डेटा आल्यानंतर प्रत्येक राज्यातील ओबीसी जातींचे एकत्रीकरण करून त्या-त्या राज्यातील ओबीसींची नेमकी लोकसंख्या अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

फुले दाम्पत्याला भारतरत्न

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याच्या मागणीवरही अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासकीय अडचणी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, एल निनोच्या संकटामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. सरकारने जाहीर केलेली 5000 रुपयांची अग्रीम मदत खात्यात जमा होत असून आणखीही मदत दिली जाईल, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

साखर कारखान्याच्या धुराची चौकशी व्हावी

रोहित पवार यांच्या साखर कारखान्याच्या धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याच्या आरोपावर बोलताना, या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हायला काहीच हरकत नाही, असे मत फुके यांनी मांडले.

मायक्रो फायनान्स कंपन्यांचा बंदोबस्त करणार

लातूरमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीच्या महिला एजंटने केलेली शिवीगाळ निषेधार्ह आहे. मागील वर्षी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एका को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मायक्रो फायनान्स एजंटांचा त्रास आपण मोडून काढला होता; त्याच धर्तीवर राज्यातील मुजोर मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे परिणय फुके यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------------------------------

हेही वाचा…

पुढला बॉम्ब टाकेन तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल: 300 एसआरए प्रकल्पांच्या घोटाळ्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील 2 ते 3 बिल्डरांसाठी नियमात न बसणारे तब्बल 300 प्रकल्प एसआरएमध्ये घुसवले जात असून, यातून राज्याचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. मी जेव्हा या प्रकरणाचा पुढला बॉम्ब टाकेन, तेव्हा मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल," असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे. बुधवारी (18 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे पत्र, रुपयाची घसरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा आणि 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links