Wed, Nov 25, 2026Updated 05:36 PM IST

सुप्रिया सुळेंवर लक्ष्मण हाकेंची टीका:म्हणाले- त्या भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्यास शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल

नांदेड1 तासापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भाजपप्रणित 'एनडीए'मध्ये (NDA) सहभागी होणार असल्याच्या आणि खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर अत्यंत जहरी टीकास्त्र सोडले

.

शेतकरी आणि कारखानदार अशा 2 भूमिकांत वावरणारे रोहित पवार नेतृत्व कसे करणार?

रोहित पवार यांच्या आगामी शेतकरी मोर्चावर लक्ष्मण हाके यांनी कडाडून टीका करत त्यांच्या हेतूवरच संशय व्यक्त केला. रोहित पवार एका बाजूला साखर कारखाने, वायनरी आणि डिस्टलरी चालवतात, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या नावाने मोर्चा काढतात. शेतकरी आणि उद्योगपती अशा 2 परस्परविरोधी भूमिकांमध्ये ते वावरत आहेत. ज्यांचे स्वतःचे अनेक कारखाने आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करण्याचे नैतिक बळ कोठून येते, असा प्रश्न पडतो.

राजकारणात स्पेस शोधण्याचा प्रयत्न

रोहित पवार सध्या राजकारणात स्वतःची जागा (स्पेस) शोधत असून, सनसनाटी निर्माण करणे आणि राज्यात विरोधक म्हणून फक्त मीच काम करतोय असे दाखवणे, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांची ही धडपड मंत्रिपदासाठी आहे की खरोखर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, हे काही दिवसांतच समोर येईल.

जनतेला संभ्रमात टाकणे हे पवार कुटुंबाचे व्यवच्छेदक लक्षण

शरद पवार यांच्या राजकीय भूमिकांवर आणि व्हीएसआर विमान कंपनीच्या वादावरही लक्ष्मण हाके यांनी जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रातील जनतेला नेहमी संभ्रमात टाकणे हे पवार कुटुंबाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकीकडे शरद पवार दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन आम्ही पुरोगामी असून फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे आहोत, असे सांगतात. महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा इतका खालावला आहे की, पवार कुटुंबाच्या कोणत्याही भूमिकेवर विश्वास ठेवण्यापूर्वी जनतेने शंभर वेळा विचार करावा.

व्हीएसआर कंपनीच्या विमानांचा वापर पवार कुटुंबानेच सर्वाधिक केला

व्हीएसआर (VSR) कंपनीसोबत सर्वाधिक संबंध पवार कुटुंबाचेच राहिले आहेत; ही कंपनी अजित पवार यांची पसंती होती आणि खुद्द रोहित पवारही याच कंपनीच्या विमानांचा वापर करायचे. आता तेच रोहित पवार मफलर दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. थोडा काळ गेल्यावर त्यांचे खरे रूप आणि नेतृत्व महाराष्ट्रासमोर येईल, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी लगावला.

-----------------------------------------------

हेही वाचा…

शिरसाटांनी 5 कोटींची लाच मागितली: संजय राऊत यांचा आरोप, म्हणाले- त्यांची 27 प्रकरणे माझ्याकडे, शिंदेंना तोंड दाखवणं अवघड होईल!

लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links