- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nashik
- Work To Remove Thorn Bushes On Jaykheda Nandin Road Begins, Seven Accidents In A Week; Administration Starts Work With The Help Of JCB
जायखेडा–नांदीन मार्गावरील काटेरी झुडपे हटविण्याच्या कामाला सुरुवात:आठवडाभरात सात अपघात; प्रशासनाकडून जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू
- कॉपी लिंक

जायखेडा (वाडीपिसोळ चौफुली) ते नांदीन मार्गावरील काटेरी झुडपे हटविण्याच्या कामाला बुधवारी (दि. १८) सुरुवात झाली. या झुडपांमुळे रस्ता अरुंद होऊन वळणांवरील दृश्यमानता कमी झाली होती. परिणामी, गेल्या आठवडाभरात या मार्गावर सात अपघात झाले होते. यामध्ये एक ज
धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणारा जायखेडा ते नांदीन हा कमी अंतराचा आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे रस्ता कमालीचा अरुंद झाला होता. तसेच वळणांवर दृश्यमानता बाधित झाल्याने वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसत नव्हती. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला होता. गेल्या आठवडाभरात या मार्गावर सात अपघात झाले असून, त्यात एक जण गंभीर जखमी झाला होता.या समस्येबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत देवरे यांच्या सूचनेनुसार शाखा अभियंता राजेश सातपुते, स्थापत्य अभियंता भूषण वाघ, ग्रामविकास अधिकारी प्रवीण सावंत आणि ग्रामपंचायत सदस्य डॉ. कपिल अहिरे यांनी मंगळवारी (दि. १७) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.दिलेल्या आश्वासनानुसार झुडपे हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्यावरील झुडपांमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांचा प्रश्न मांडला होता. त्याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने काम सुरू केले. त्यामुळे भविष्यात अपघात टळण्यास मदत होईल आणि शेतमालाची वाहतूकही सुरक्षित होईल. या प्रश्नाच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली आहे.- डॉ. कपिल अहिरे, ग्रामपंचायत सदस्य, जायखेडा












