- Marathi News
- Local
- Maharashtra
- Mumbai Kurla Park Assault Case; Minor Gang Attacked Couple | VIDEO
मुंबईत उद्यानात जोडप्याला अल्पवयीन टोळक्याची मारहाण:बेल्ट, काठ्या अन् दगडांनी हल्ला; 8 मुलांवर गुन्हा दाखल, पालकांनाही नोटीस
- कॉपी लिंक

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फिनिक्स मॉलजवळील महापालिकेच्या उद्यानात एका तरुण जोडप्याला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने बेल्ट, काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्याचा व्हिडिओ सोशल
उद्यानात नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चिराग नगरमधील प्रमोद महाजन उद्यानात हा प्रकार घडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ८ ते १० अल्पवयीन मुलांचे टोळके या तरुण-तरुणीला घेराव घालताना दिसत आहे. तरुणाने या मुलांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र टोळक्याने त्याला बेल्ट, काठ्या आणि बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. या मुलांनी तरुणीलाही सोडले नाही; तिलादेखील काठ्यांनी व बुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर दगड भिरकावले. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. या मुलांनी जोडप्यावर हल्ला का केला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांची कारवाई आणि पालकांना नोटीस
या घटनेनंतर पीडित तरुणीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ८ विधीसंघर्षित बालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच, संबंधित मुलांच्या पालकांनाही पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

--------------------
हेही वाचा..
मोदींचा राजयोग संपला:2029 पर्यंत जनतेचा दबाव कायम राहिल्यास भाजपची सत्ता येणार नाही, राऊतांचा हल्लाबोल; नाशिक स्वीकृत नगरसेवक वादावरही भाष्य

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल, पुण्यातील टिपू सुलतान वाद, नाशिकमधील राजकीय घडामोडी आणि परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजयोग संपला असल्याचा दावा राऊत यांनी यावेळी केला. सविस्तर वाचा












