Wed, Nov 25, 2026Updated 09:16 PM IST

न्यायदेवतेच्या दारातच अराजकता! पुणे गोळीबारावरून सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल:म्हणाले, महाराष्ट्राला तालिबान करण्याचं स्वप्न पूर्ण झालं का?

मुंबई2 तासांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्याय मागण्यासाठी नागरिक ज्या न्यायालयाच्या दारात येतात, त्याच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर एका तरुणावर गोळ

.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर ही घटना घडली. न्यायालयात आलेल्या एका तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने लक्ष्य केले. हल्लेखोरांनी तरुणावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर कोयत्याने सपासप वार केले. प्राथमिक माहितीनुसार, टोळीयुद्धातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाबाहेर अशा प्रकारे सशस्त्र हल्ला झाल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. महाराष्ट्राचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत का, असा सवाल उपस्थित करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. न्यायालयाच्या परिसरातच नागरिक सुरक्षित नसतील, तर सामान्य माणसाने सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची, असा प्रश्नही त्यांच्या टीकेतून उपस्थित झाला. राज्याचे गृहमंत्रिपदही मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने या परिस्थितीची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला.

सपकाळ सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. पुण्यातील गोळीबाराच्या घटनेवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संविधान वाचन दौऱ्यावरही टीका केली.

'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'; शिंदेंच्या संविधान वाचन दौऱ्यावर टीका

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या संविधान वाचन दौऱ्याबाबत बोलताना सपकाळ यांनी 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी टीका केली. '50 खोके, सगळं ओके' असा नारा देणारे आणि ज्या पक्षात मोठे झाले, त्याच पक्षाशी गद्दारी करणारे आता संविधान हातात घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक अशी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय खेळी करण्याची पद्धत आता शिंदे गटानेही आत्मसात केली असल्याचा आरोप त्यांनी केला. केसाने गळा कापण्याची कला संघाकडून शिकली असल्याची टीका करत, गद्दार सेना आता स्वतःला संविधानवादी म्हणून सादर करत असल्याचे सपकाळ म्हणाले. संविधानाच्या नावाखाली राजकीय प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पक्ष आणि चिन्हांच्या लढाईवरून भाजपवर निशाणा

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईवरही सपकाळ यांनी भाष्य केले. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाकडून संबंधित कायदा गुंडाळून ठेवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात आता केवळ पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असल्याचे सांगत, पूर्वी पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा होती, आता पक्ष पळवणारी गँग महाराष्ट्रात सक्रिय झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नेतृत्व शरद पवार यांच्याकडे, तर शिवसेनेचे मूळ नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असल्याचे सर्वांना माहीत आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या NDA मधील भूमिकेवर भाष्य

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र आणि राज्यातील एनडीएला पाठिंबा दिला जाण्याच्या चर्चेवरही सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. देशातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित डिलिमिटेशन विधेयकावर त्यांनी आक्षेप घेतला. हे विधेयक देशहिताच्या विरोधात असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

सध्या देशात केवळ फोडा आणि तोडा असे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत, या विधेयकाला केवळ इंडिया आघाडीच नव्हे, तर काँग्रेसही विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह इंडिया आघाडीतील कोणताही पक्ष या विधेयकाला सहकार्य करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विधेयकाविरोधात काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

हेही वाचा…

4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप

अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links