Mon, Nov 23, 2026Updated 11:45 PM IST

रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही:पक्षाचा झेंडा घेऊन लढल्यास सर्व नेते सोबत येतील : शशिकांत शिंदे

सातारा1 तासापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी 4 डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित केलेल्या न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चावरून पक्षात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्

.

सातारा येथे माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाबाबत पक्षाची भूमिका मांडली. रोहित पवार आंदोलन करत आहेत म्हणून पक्षातील नेत्यांना त्यांच्यापासून दूर राहण्याचे किंवा आंदोलनाला विरोध करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या 26 तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत दिलेल्या निरोपाचा कोणीतरी चुकीचा अर्थ लावला. निरोपाचा कोणीतरी 'ध चा मा' केला, अशा शब्दांत त्यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले.

रोहित पवार यांनी यापूर्वी नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने केली होती. त्या वेळी स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील प्रमुख नेते त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा विरोध असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन केल्यास सर्व नेते सहभागी होतील

रोहित पवार यांचा ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी असून त्यामध्ये दुष्काळ आणि टँकरच्या समस्यांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचाही समावेश होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पाणीटंचाई आणि शेतीशी संबंधित प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्यास त्याची व्याप्ती वाढू शकते. त्यामुळे या सर्व विषयांवर पक्षातील नेत्यांनी एकत्रित चर्चा करून आंदोलनाची दिशा निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

हा शरद पवार यांचा पक्ष असून महत्त्वाचे निर्णय एकत्रित चर्चेतून घेतले गेले पाहिजेत. रोहित पवार यांनी शरद पवार आणि पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यास पक्षाचे सर्व नेते 100 टक्के त्यांच्या सोबत आंदोलनात उतरतील. पक्षाच्या माध्यमातून एकत्रितपणे लढा दिल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक व्यापक स्वरूपात वाचा फोडता येईल, असेही शिंदे म्हणाले.

रोहित पवारांना स्वतंत्र भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य

दरम्यान, पक्षाच्या अधिकृत चिन्हावर आंदोलन करायचे असल्यास त्याबाबत पक्षात चर्चा आणि आवश्यक मंजुरी घेण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, पक्षाच्या चिन्हाशिवाय स्वतंत्रपणे आंदोलन करण्याचा निर्णय रोहित पवार यांचा वैयक्तिक असेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात स्वतःची भूमिका मांडली होती. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सूचित केले.

सरकारने चर्चेला बोलावले असेल तर बैठकीला जावे

रोहित पवार यांच्या 4 डिसेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चर्चेचे निमंत्रण आले असल्यास त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असा सल्लाही शशिकांत शिंदे यांनी दिला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समितीचे प्रमुख या नात्याने चर्चेसाठी बोलावले असेल, तर सरकारशी चर्चा करण्यात काहीच गैर नाही. रोहित पवार यांनी बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सरकारसमोर मांडाव्यात, असे ते म्हणाले.

सरकार चर्चेतून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यास तयार असेल, तर त्याचा विचार करायला हवा. मागण्यांची पूर्तता होत असल्यास आंदोलनाबाबत फेरविचार करण्यासही हरकत नसावी. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

एकूणच, रोहित पवार यांच्या न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चाला पक्षाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करताना शशिकांत शिंदे यांनी आंदोलन पक्षाच्या झेंड्याखाली एकत्रितपणे करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे 4 डिसेंबरच्या नागपूर मोर्चात रोहित पवार पक्षाच्या अधिकृत नेतृत्वासह सहभागी होतात की स्वतंत्रपणे आंदोलनाची भूमिका कायम ठेवतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा….

रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला पक्षातूनच विरोधाची चर्चा:खासदार अमर काळेंचा मात्र पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सध्या अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर पुकारलेल्या 'न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा'वरून पक्षांतर्गत मतभेद समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी रोहित पवार यांच्या मोर्चाला जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे वेधले गेले आहे. सविस्तर वाचा….


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links