- Marathi News
- Local
- Maharashtra
- SIT Probe Into Manoj Jarange Patil 500 Crore Controversy; Ankushnagar Visit
BREAKING500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'चा तपास:SIT चे 6 अधिकारी जरांगेंच्या घरी पोहोचले, ऑडिओ क्लिपसह पुरावे ताब्यात घेणार
- कॉपी लिंक

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या आरोपप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीचे सहा अधिकारी बुधवारी सायंकाळी 7:30 वाजता अंकुशनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नि
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या क्लिपमधील संभाषणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या कथित व्यवहारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही विविध स्तरांतून करण्यात येत होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एसआयटीने तपासाची प्रक्रिया सुरू केली असून, ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता पडताळण्यावर भर दिला जात आहे. संबंधित रेकॉर्डिंगमध्ये नेमके कोणाचे आवाज आहेत, संभाषण कधी आणि कुठे झाले, तसेच या रेकॉर्डिंगचा मूळ स्रोत काय आहे, याचा शोध तपास यंत्रणेकडून घेतला जात आहे.

ऑडिओ क्लिप आणि मूळ रेकॉर्डिंग महत्त्वाचे
एसआयटीच्या तपासात ऑडिओ क्लिपचे मूळ रेकॉर्डिंग आणि त्यासंदर्भातील पुरावे महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्याकडे उपलब्ध असलेली ऑडिओ रेकॉर्डिंग, क्लिपशी संबंधित माहिती आणि अन्य पुरावे तपासासाठी मिळवण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या पुराव्यांच्या आधारे ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी, आवाजांचे नमुने आणि संभाषणातील संदर्भ यांची पडताळणी केली जाऊ शकते.
दरम्यान, एसआयटीचे सहा अधिकारी थेट मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अधिकाऱ्यांची जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू असून, या भेटीत नेमके कोणते पुरावे ताब्यात घेतले जातात आणि चौकशीतून कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप

अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी












