- Marathi News
- Local
- Maharashtra
- Thane Police Commissioner Ashutosh Dumbare WhatsApp Hacked; Video Viral
ठाणे पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक:स्टेटसवर 12 हून अधिक अश्लील व्हिडीओ अपलोड, हॅकरचा शोध सुरू
- कॉपी लिंक

सायबर गुन्हेगारांनी आता थेट पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे मोबाईलमधील व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अकाऊंटचा ताबा मिळवल्
नेमका काय घडला प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटचा वापर करून अश्लील स्वरूपाचे व्हिडीओ व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवण्यात आले. त्यांच्या संपर्क यादीतील अनेकांना हे स्टेटस दिसण्याची शक्यता असल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.
पोलीस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मोबाईलचे किंवा व्हॉट्सॲप अकाऊंटचे हॅकिंग झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिकांपासून ते वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचेही डिजिटल अकाऊंट सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर येऊ शकते, हे या घटनेतून समोर आले आहे.
हॅकरचा शोध सुरू; पोलीस तपासाकडे लक्ष
या घटनेनंतर संबंधित अकाऊंट हॅक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॅकरने नेमक्या कोणत्या पद्धतीने अकाऊंटचा ताबा मिळवला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या प्रकारामागे केवळ खोडसाळपणा होता की अन्य काही उद्देश होता, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, थेट पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक झाल्याने पोलीस दलात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेच्या सायबर सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सामान्य नागरिकांच्या सायबर सुरक्षेचा प्रश्न
सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करून त्याचा गैरवापर करण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अनेकदा अशा अकाऊंटच्या माध्यमातून संपर्कातील व्यक्तींना फसवणुकीचे मेसेज पाठवणे, आर्थिक मदत मागणे किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे असे प्रकार घडतात.
मात्र, आता ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचेच अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आल्याने सामान्य नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर हॅकिंगमागील नेमके कारण आणि आरोपीची माहिती स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा….
फोटो म्हणजे पाठिंबा नाही, राजकारण करू नका:एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांना टोला, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे किंवा त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे त्या व्यक्तीला पाठिंबा देणे असा अर्थ होत नाही. केवळ फोटोच्या आधारावर कोणावरही आरोप करणे योग्य नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. सध्या राज्यातील शेतकरी संकटात असून दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जात आहेत. अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सविस्तर वाचा….












