Mon, Nov 16, 2026Updated 06:58 PM IST

पुण्यात सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा:52 लाखांच्या दागिन्यांची चोरट्यांकडून लुटमार

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील हडपसरमधील शेवाळवाडी भागात शनिवारी सायंकाळी एका सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून ५२ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

.

याप्रकरणी महावीर ज्वेलर्सचे मालक महेंद्रसिंह सोलंकी (वय ३७) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोलंकी यांच्या सराफी पेढीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते एकटेच होते.

त्यावेळी खरेदीच्या बहाण्याने चार चोरटे पेढीत शिरले, तर त्यांचा एक साथीदार बाहेर थांबला होता. चोरट्यांनी सोलंकी यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पेढीतील दागिने एका पिशवीत भरले.

दागिने लुटल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी सुरू आहे. आरोपी नेमके कोणत्या मार्गाने पसार झाले, त्यांचे इतर साथीदार कोण होते याबाबत तपास करण्यात येत आहे.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस देखील या घटनेचा समांतर तपास करत आहेत. विशेष म्हणजे, आठवड्याभरापूर्वी खडकवासला-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील एका सराफी पेढीवरही भरदिवसा दरोडा टाकून चोरट्यांनी सव्वा कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. त्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन चोरट्यांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links