Mon, Nov 16, 2026Updated 06:55 PM IST

महिलांचे अनुभव रॅम्पवर मांडणारा ‘मुक्ता’ शो 12 डिसेंबरला:पुण्यात आयोजन; विधवा, एकल माता, दिव्यांगांसह विविध गटांतील महिलांचे संघर्ष सादर होणार

पुणे45 मिनिटांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधवा, एकल माता, दिव्यांग आणि विविध गटांतील महिलांचे अनुभव रॅम्पवर मांडणारा ‘मुक्ता – एका श्वासाची कहाणी’ हा फॅशन शो १२ डिसेंबरला पुण्यात होणार आहे. अखिल भारतीय जाणीव संघटनेतर्फे वडगाव शेरीतील रामचंद्र सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासोबत ‘M

.

फॅशन शोमधून समाजातील विविध गटांतील महिलांचे अनुभव आणि संघर्ष सादर केले जातील. यात विधवा, एकल माता, अत्याचारग्रस्त, दिव्यांग, निराधार आणि वृद्ध महिलांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला तसेच तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश आहे.

वेशभूषा, संगीत, प्रकाशयोजना आणि रंगमंचीय सादरीकरणातून त्यांच्या जिद्दीची, सामर्थ्याची आणि नव्याने आयुष्य उभे करण्याच्या इच्छाशक्तीची ओळख करून दिली जाईल.

‘मॅजेस्टिक महाराष्ट्र’ स्पर्धेत मिस, मिसेस आणि मिस्टर अशा तीन गटांत सहभागी होता येईल. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलीस, शिक्षक, बँकर आणि उद्योजक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्व सादर करण्याची संधी मिळेल. विजेत्यांना मुकुट, विजेता पट्टा, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

या उपक्रमातून महिलांसाठी कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

‘स्त्रीचे सौंदर्य तिच्या चेहऱ्यात नसून तिच्या संघर्षात, जिद्दीत आणि स्वाभिमानात असते. प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार आहे. ‘मुक्ता’ हा त्याच विचाराचा आविष्कार आहे,’ असे शो डायरेक्टर महेश नंदकिशोर चरवड यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला आनंद पायाळ, स्नेहल जाधव, पूजा वाघ, सुमैय्या पठाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links