Thu, Nov 19, 2026Updated 09:59 AM IST

सातारा जिल्हा बँकेच्या निकालावरून जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंना इशारा:जखम भरून काढण्यासाठी अघोरी विद्या वापराल, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

सोलापूर53 मिनिटांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपासून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेली धुसफूस आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवत म

.

मुख्यमंत्र्यांनी युतीचा आदेश दिला नसता तर तुम्ही सत्तेतच आला नसता

सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने भाजपला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. यावर भाष्य करताना गोरे म्हणाले की, साताऱ्यातील या निवडीनंतर वास्तविक पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत. जर मुख्यमंत्र्यांनी महायुती करण्याचा आदेश दिला नसता, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सत्तेत आले नसते.

जिल्हा परिषद आणि बँकेची तुलना अयोग्य

सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही एकमेकांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढलो होतो; मात्र जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढलो. त्यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक निवडणुकीची तुलना होऊच शकत नाही.

चर्चेचे अधिकार शिवेंद्रराजेंकडे होते

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढलो आणि जागावाटप व पदांबाबत चर्चेचे सर्व अधिकार त्यांनाच होते. त्यामुळे पडद्यामागे नेमक्या काय चर्चा झाल्या आणि काय घडले, याची आपल्याला कल्पना नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

ही काही शेवटची निवडणूक नाही; जे पेराल तेच उगवेल!

शंभुराज देसाई यांच्या 'जखम भरून निघाली' या विधानाचा संदर्भ देत जयकुमार गोरे यांनी त्यांना पुढील निवडणुकांची आठवण करून दिली. "तुमच्यात खरोखरच दम होता तर जिल्हा बँक स्वतंत्र लढवून दाखवायची होती, मग जखम भरून निघाल्याचे प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार होता. ही काही शेवटची निवडणूक नाही; राजकारणात जे पेराल तेच उगवते, हे नेहमी ध्यानात ठेवा," अशा शब्दांत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला.

हा विषय संपूर्ण राज्याचा नसून एका जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याने त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे नमूद करत साताऱ्यात भाजपला डावलण्याच्या या प्रकाराबाबत आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

--------------------------------------------

हेही वाचा…

20 वर्षे काँग्रेसमध्ये पदे भोगताना सावरकरांचा अपमान दिसला नाही का?:सोनिया गांधींचे पुस्तक फाडणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची अखिल चित्रेंनी काढली कुंडली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडल्यानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. ज्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर टीका केली, त्यातील प्रमुख सूत्रधार हे स्वतः अनेक दशके काँग्रेसमध्येच कार्यरत होते, याची आठवण करून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अखिल चित्रे यांनी शिंदे गटावर जोरदार पलटवार केला आहे. समाजमाध्यम 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत चित्रे यांनी संजय निरुपम, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा यांच्या जुन्या काँग्रेस कारकीर्दीचा पाढा वाचत, "राजकीय सोयीनुसार जागे होणारे हे सावरकरप्रेम आहे," असा सणसणीत टोला लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links