Thu, Nov 19, 2026Updated 09:59 AM IST

फक्त तीनच जागा मागितल्या होत्या;‎काहींच्या आडमुठेपणामुळे निवडणूक:मोहिते-पाटील गटाचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी केला आरोप

सोलापूर1 तासापूर्वी
  • कॉपी लिंक

डीसीसी बँक ही सोलापूरकरांची बँक आहे. आज बँकेच्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षाचे १९ पैकी १० जागा बिनविरोध होऊन आमचे बहुमत आहे. अन्य ९ जागा निवडून येण्यासाठी किंतु परंतु असू शकते पण एकत्र येऊन ताकदीने लढा. कुठल्याही तालुक्यात क्रॉस वोटींग चालणार नाही, झ

.

श्री सिद्धेश्वर मंदिर येथे डीसीसी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा व मित्र पक्षाच्या प्रचारांच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते. ते म्हणाले, ही निवडणूक युवकांसाठी असून प्रशांत परिचारक वगळता सर्व युवक आहेत. मी फक्त समन्वयक आहे. काही जण ही निवडणूक बिनविरोध होईल असे म्हणत होते. पण, त्यांनीच निवडणूक लढण्यासाठी तयारी केली. ज्या शक्तींनी बँक अडचणीत आणली, त्यांनीच जिल्हा बँकेला डाग लावला.

डीसीसी बँकेच्या भाजप व मित्र पक्षांचा शुभारंभ पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात झाला. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, राजन पाटील, बबन शिंदे, दिलीप माने, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. निवडणुकीत बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर रिंगणात असलेल्या नऊ जणांचा परिचय करुन देण्यात आला. यावेळी आमदार राजन पाटील यांनी बँकेची पार्श्वभूमी सांगितली.

प्रतिनिधी | सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जागावाटपावरून एकमत न झाल्याने अखेर निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत आम्ही अवास्तव नाही, तर आमच्या क्षमतेनुसार तीनच जागांची मागणी केली होती. मात्र काही जणांच्या आडमुठ्या मानसिकतेमुळे ही निवडणूक लादली गेली आहे, असा घणाघात मोहिते-पाटील गटाचे उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, ठाकरे सेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिंदे सेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, शिवाजी पाटील - चांदजकर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची आणि स्वतःचीही हीच प्रामाणिक इच्छा होती की बँकेची निवडणूक मोठ्या प्रमाणावर बिनविरोध व्हावी. त्यासाठी बैठका आणि चर्चाही झाल्या. मात्र, विरोधी गटाने केवळ तीन जागांचा प्रस्ताव दिला. आम्ही अवास्तव नाही तर वाजवी जागांची मागणी केली होती. पण काही लोकांची मानसिकता बिनविरोध करण्याची नसल्यामुळे चर्चा फिस्कटली आणि अखेर निवडणूक लागली. दबावतंत्राचा वापर करून कुणीही माघार घेतलेली नाही, जे काही घडले ते रणनीतीनुसार घडल्याचेही ते म्हणाले. जिल्हा बँक ही शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांची संस्था असून तिचे हित जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. निवडणूक लागली असली तरी सभासदांनी योग्य उमेदवारांना संधी द्यावी आणि बँकेच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले.

बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी, राजकीय फायद्याची नाही या निवडणुकीतील आमचा मुख्य मुद्दा हाच आहे की, ही बँक शेतकऱ्यांची आहे आणि ती शेतकऱ्यांच्याच हितासाठी वापरली गेली पाहिजे. यातून कुणीही आपले वैयक्तिक राजकीय फायदे किंवा राजकीय मुद्दे साधू नयेत. सध्या जिल्ह्यात ऊस दराचा आणि इतर तांत्रिक (एआय डेटा सेंटर इ.) प्रश्नांमुळे शेतकरी काही प्रमाणात नाराज आहेत. बँकेने या तांत्रिक बाबींचा केवळ आवाका न बघता शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ कसा मिळेल यावर काम करणे गरजेचे आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links