Mon, Nov 23, 2026Updated 09:29 AM IST
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Two wheeler car Accident On Velapur Maloli Road; Two Friends Died, One Injured, Driver Absconded After The Accident, Case Registered With Velapur Police

वेळापूर-मळोली मार्गावर दुचाकी- कारचा अपघात:दोन मित्रांचा मृत्यू, एक जखमी, अपघातानंतर चालक फरार, वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल

अकलूज48 मिनिटांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळापूर-मळोली मार्गावर रविवारी सकाळी समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुण अद्याप बेशुद्ध असून, त्याच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू

.

याबाबत वेळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मळोली (ता. माळशिरस) येथील रोहन जाधव, त्याचे मित्र मयूर शिंदे आणि सागर मगर हे तिघे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच ४५ एएच ४३३८) वरून वेळापूरहून मळोलीकडे जात होते. यावेळी भाऊसो जाधव यांच्या घराजवळ समोरून आलेल्या कारने (एमएच ११ डीझेड २१७२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, रोहन जाधव यांचा उजवा पाय तुटून सुमारे ५० फूट अंतरावर जाऊन पडला. चारचाकी वाहनाने मोटारसायकलसह तिघांना सुमारे २०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. चारचाकीचा चालक संजय नामदेव बडेकर (रा. कराड) हा मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने अकलूज येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच रोहन जाधव आणि मयूर शिंदे (दोघेही वय २४) यांचा मृत्यू झाला. सागर मगर हा गंभीर जखमी झाला.

याप्रकरणी मृत रोहन जाधव यांचे चुलते श्रीपती जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी कार चालक संजय बडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस सहायक निरीक्षक आशिष कांबळे पुढील तपास करीत आहेत.

रोहन जाधव याचा अवघ्या चार दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात साखरपुडा झाला होता. नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच रोहनचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.


LockIcon
Content blocker

अर्धवट नाही! वाचा पूर्ण! वाचा पूर्ण बातमी दिव्य मराठी अ‍ॅपवर

DB QR Code
अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी QR स्कॅन कराDownload android app - Divya MarathiDownload ios app - Divya Marathi
पूर्ण बातमी वाचा अ‍ॅपवरप्रीमियम मेंबरशिप असेल तर लॉगिन करा

Local News

Today Weather Update

Our Group Site Links