- Marathi News
- National
- AIMIM Leader Murtaza Pehalwan Murder Case; Attack In Rangareddy
ओवैसी यांच्या पक्षाच्या नेत्यावर भर रस्त्यात चाकूने वार:रुग्णालयात नेत असताना मृत्यू; रंगारेड्डीत 8-10 जणांनी हल्ला केला
1 तासापूर्वी
- कॉपी लिंक

तेलंगणातील रंगारेड्डी येथे AIMIM नेते मुर्तजा पहलवान यांची सोमवारी हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी मुर्तजा यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. गंभीर दुखापती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
AIMIM चे बहादूरपुरा मतदारसंघाचे आमदार मोहम्मद मुबीन यांना हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर ते जर्मन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मोहम्मद मुबीन यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात सुमारे 8 ते 10 जणांचा सहभाग होता.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रुग्णालयातील भेटीची छायाचित्रेही शेअर केली.

.












